टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मुख्य संशोधन अधिकारी पदासाठी भरती, या दिवशी होणार मुलाखत प्रक्रिया
Tata Memorial Hospital (Photo Credits: Tata Official site)

मुंबईतील कर्करोगासाठी प्रसिद्ध असलेले हॉस्पिटल टाटा मेमोरियल मध्ये मुख्य संशोधन अधिकारी (Chief Research Fellow) पदासाठी भरती होणार आहे. येत्या 9 ऑक्टोबरला इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी विशेष मुलाखत ठेवण्यात आली आहे. या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण मुंबई असेल. ह्या पदासाठी Preventive & Social Medicine (PSM)मधील पदवीधर असलेल्याच इच्छुक उमेदवारने अर्ज करावे अशी अट घालण्यात आली आहे. तसेच या पदावरील उमेदवारास महिना 65,000 ते 80,000 रुपये वेतनश्रेणी ठरविण्यात आली आहे.

मुख्य संशोधन अधिकारी पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 9 ऑक्टोबरला सकाळी 10:00 वाजल्यापासून मुलाखत होणार असून त्याच्या आधारावर पात्र उमेदवार निवडण्यात येणार आहे.

मुलाखतीची महत्वाची माहिती:

पद: मुख्य संशोधन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: एम.डी. पीएसएम पदवीसह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव

शुल्क: नि:शुल्क

वेतनमान: 65,000 रुपये ते 80,000 रुपये

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण: टाटा मेमोरियल हॉस्पिटल, एच.आर.डी. डिपार्टमेंट, 4 था मजला, सर्विस ब्लॉक बिल्डिंग, डॉ. अर्नेस्ट बोर्गेज मार्गे, परेल, मुंबई-400012

हेही वाचा- Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र राज्यभर पोलिस शिपाई भरती 2019 ला आजपासून सुरूवात; mahapariksha.gov.in वर करा अर्ज

मुलाखतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे:

1. उमेदवाराने अर्जाच्या फॉर्ममध्ये आपले शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय इत्यादी नीट आणि विचारपुर्वक वाचून भरावी.

2. या पदासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रांची मूळ प्रत आणि त्यांच्या कॉपीज अवश्य सोबत न्यावीत.

या पदासंबंधी अन्य काही माहिती हवी असल्यास www.tmc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन याविषयी सविस्तर माहिती मिळवू शकता.