UP Police: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अयोध्या येथे पोलिसांकडे एक विचित्र तक्रार आली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार एका 19 वर्षीय तरुणीने आपल्या वडिलांविरोधात केली आहे. तक्रारीचे कारण ऐकून अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत. तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचे वडील तिच्या (मुलगी) आणि बॉयफ्रेंडच्या आड येतात. ते तिला बॉयफ्रेंडशी बोलण्यास कथीतरित्या विरोधत करतात. ते तिला फोनवर बोलू देत नाहीत. या मुद्द्यावरुन त्यांनी तिला अनेकदा छेडले आहे, असेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
मुलीने दिलेली तक्रार नोंदवून घेतल पोलिसांनी तक्रारकर्त्या मुलीच्या विडिलांविरोधात धमकी आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या वडिलांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. तसेच, सज्जड दम भरत पोलिसांनी पित्याला समज दिली आणि सोडून दिले. या गुन्ह्यामध्ये अटक करता येत नाही. केवळ या सबबीखाली वडिलांची सुटका झाली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार हा सगळा प्रकार 11 जुलैच्या रात्री घडला. जामुनियामाऊ गावात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास असलेली एक 19 वर्षीय तरुणी रात्री 9 च्या दरम्यान तिच्या प्रियकराशी कथीतरित्या बोलत होती. या वेळी तिच्या वडिलांनी त्यांच्या बोलण्यात अडथळा आणला असे रुदौलीचे एसएचओ देवेंद्र सिंह यांनी सांगितले. (हेही वाचा, HC on Age Of Consensual Sex: लैंगिक संबंधांची वयोमर्यादा भारतात 18 वर्षापेक्षा कमी करण्यासाठी संवैधानिक बदल करण्याची गरज; Bombay High Court चं मत)
एसएचओ देवेंद्र सिंह यांनी पुढे म्हटले की, मुलीला फोनवर बोलताना पाहून, तिच्या वडिलांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्यांनी कुटुंबीयांना मुलीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचेही समोर आले. वडिलांच्या कृत्याचा मुलीला राग आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या प्रियकराला घरी बोलावले आणि नंतर रुदौली पोलिस स्टेशन गाठले आणि आम्हाला लेखी तक्रार दिली. तक्रार पाहून मला धक्का बसला आणि तिच्या वडिलांना गावातून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मी कुटुंबातील इतर सदस्यांना आणि काही समुपदेशकांनाही मुलगी आणि तिच्या वडिलांमध्ये संवाद साधण्याची विनंती केली. एका महिला उपनिरीक्षकाला तिच्याशी बोलण्यास सांगितले, असेही एसएचओ म्हणाले.