आनंदाची बातमी: 1 फेब्रुवारीपासून 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मोदी सरकारने 10 टक्के सवर्णांना आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून देशभरातील गरिब सवर्णांना केंद्र सरकारच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. 1 फेब्रुवारी नंतर नियुक्त्या होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू केले जाणार आहे. गरिब सवर्णांपैकी ज्या लोकांनी कधीही कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेतलेला नसेल, आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांहून कमी आहे, असे सर्व गरिब सवर्ण आरक्षणासाठी पात्र असणार आहेत.

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदार कुटुंबाला तहसीलदार किंवा तहसीलदाराहून वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्याकडून आपले उत्पन्न आणि संपत्तीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. या आरक्षणासाठी पत्र असलेले लोक 1 फेब्रुवारी 2019 किंवा त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.

हे आरक्षण कोणाला मिळेल –

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना आरक्षणचा फायदा मिळेल. 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या उच्च वर्णीयांना, तसेच 1000 चौरस फुटपेक्षा कमी जागेत घर असेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ज्यांच्याकडे अधिसूचित नगरपालिका क्षेत्रात 100 हून कमी जागेत घर असेल त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. याशिवाय, ज्या लोकांना नॉन-अधिसूचित नगरपालिकेच्या 200 हून कमी जागेची निवासी जागा असेल त्या आरक्षणचा फायदा मिळेल.