Unseasonal Rain In Maharashtra: महाराष्ट्रावर अजूनही पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचे सावट; मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता
Unseasonal Rain | Twitter

महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग अजूनही सरलेले नाहीत. हवामान खात्याकडून (IMD) पुन्हा आज 11 एप्रिल 2023 पासून पुढील 5 दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 दिवसामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसू शकतो. सामान्य नागरिकांसोबतच शेतकर्‍यांनी देखील आपल्या शेतमालाचं नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये 13 ते 15 एप्रिल दरम्यान गारपीटाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भामध्ये हलका पाऊस बरसू शकतो. होळीपासून राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन पीकाचं झालेलं नुकसान पाहत आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे.

हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, नाशिक कोल्हापूर, अमरावती, नागपूर मधील नागरिकांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. पुढील काही पावसासोबतच वीजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. अशावेळी झाडाखाली आसरा न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नक्की वाचा: Unseasonal Rains: शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी रुपयांचा निधी वितरीत .

राज्यात 16 एप्रिल नंतर अवकाळी पावसाचं सावट दूर होण्याची चिन्हं आहेत. असाही आयएमडीचा अंदाज आहे.