Bhiwandi: भिवंडीतील काल्हेर येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
shivsena | (Photo Credit: File Photo)

भिवंडीतील (Bhiwandi) काल्हेर (Kalher) येथील शिवसेना (Shiv Sena) शाखाप्रमुख दीपक म्हात्रे (Deepak Mhatre) यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोळीबार चुकवल्याने दीपक महात्रे आणि त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या आहेत. या घटनेनंतर आजुबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दीपक म्हात्रे यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला आहे. दीपक म्हात्रे हे पत्नीसह वैयक्तिक कामासाठी ठाण्यात गेले होते. रात्री उशीरा घरी आल्यानंतर गाडी पार्क केली. तेव्हाच अज्ञात व्यक्तीनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार; आरोपीला अटक

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनंतर दिपक म्हात्रे यांच्या समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण झाले आहे .