Ulhasnagar Building Collapsed Update: उल्हासनगर मधील साई शक्ती इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घटनास्थळाची पाहाणी (Photo Credits: Twitter)

उल्हासनगर (Ulhasnagar) मधील नेहरू चौक येथील साई सिद्धी (Sai Shakti) या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दृर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाण्यामधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांनी घटनास्थळी भेट देत पाहाणी केली. त्यानंतर दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. (Ulhasnagar Building Collapse: उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु)

ढिगाऱ्या खालून सुखरूप बाहेर काढलेल्या नागरिकांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसंच धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरविरोधात कारवाई करण्याचा सूचनाही त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे ट्विट्स:

काल रात्री या इमारतीचा स्लॅब कोसळून ही दृर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच  पोलिस, अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये मोहिनी पॅलेस इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला होता.