उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या मुलाचा शोध घेत आहे. उल्हासनगर गोळीबार (Ulhasnagar Firing) प्रकरणामध्ये आरोपी असलेले भाजप आमदार (BJP MLA) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचे सुपुत्र वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) आणि नागेश बडेकर (Nagesh Badekar) या आरोपी सध्या फरार आहेत. दरम्यान गणपत गायकवाड यांनी कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये अन्नत्याग केला आहे. ( Ganpat Gaikwad Firing Case: गणपत गायकडवाडांच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर घोषणाबाजी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल)
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या घटनेत नसतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अन्न त्याग केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. बुधवारी डॉक्टरांनी आमदार गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यात तपासणीत त्यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. सध्या ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये आमदार गणपत गायकवाड यांना ठेवण्यात आलं आहे. त्यांची कळव्यातील पोलीस स्टेशन मधील जेलमध्येच वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.