Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

Uddhav Thackeray To Visit Delhi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंगळवारी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Visit To Delhi) जाणार आहेत. राष्ट्रीय राजधानीच्या त्यांच्या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, ते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि इंडिया ब्लॉक (INDIA Bloc) च्या इतर नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी सोमवारी सांगितले की, उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबत राष्ट्रीय राजधानीला भेट देतील. उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान दिल्लीत असतील. ते दिल्लीत काही नेत्यांची भेट घेतील. (हेही वाचा -Uddhav Thackeray On Gautam Adani: सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करु; उद्धव ठाकरे यांचा गौतम अदानी यांना इशारा, सरकारवर निशाणा)

उद्धव ठाकरे दिल्लीत टीएमसी, आप आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तीन दिवस दिल्लीत असणार आहेत, त्यामुळे अनेक मुद्द्यांवर बैठका आणि चर्चा होणार आहेत. महाराष्ट्रातील इतर पक्षाच्या काही खासदारांनीही त्यांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्याचेही आयोजन करणार आहोत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा, Shankaracharya Avimukteshwaranand On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासोबत 'विश्वासघात' झाला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद)

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, दोन्ही नेत्यांमधील भेटीबाबत मी भाष्य करू शकत नाही. पवार साहेबांची त्यांच्याशी भेट धारावीसाठी झाली असे मी म्हणू शकत नाही, परंतु धारावीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. ही 600 एकर जमीन आहे. तेथे 8 लाख लोक राहतात. त्यांना सर्वांना पुनर्वसन योजना मिळाव्यात. त्याच ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, असेही यावेळी संजय राऊत यांनी नमूद केले. (हेही वाचा, Gautam Adani On Indian Economy: 2032 पर्यंत भारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल; गौतम अदानी यांची भविष्यवाणी)

तत्पूर्वी 3 ऑगस्ट रोजी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. महाराष्ट्रात सरकार आल्यावर ते धारावी पुनर्विकासाची निविदा रद्द करतील, असेही शिंदे म्हणाले होते. जर आमचे सरकार सत्तेवर आले तर आम्ही धारावी पुनर्विकासाची निविदा रद्द करू.