Uddhav Thackeray | (Facebook)

Uddhav Thackeray on Target Killing: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सक्रिय झाले आहेत. टार्गेट किलिंग (Target Killing) करून दहशतवादी सातत्याने लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. यापूर्वी काश्मीरमध्ये दहशत पसरवताना दहशतवाद्यांनी राहुल भट्ट, शिक्षिका राजबाला आणि महसूल विभागात काम करणारे बँक कर्मचारी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्यासाठी आता अनेक राजकीय पक्षांनी यावर भाष्य केले आहे.

काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना लक्ष्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला असून, काश्मिरी पंडितांसाठी जे काही करता येईल ते करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा - Mumbai Local Megablock Update: मुंबई लोकलचा 5 जूनला जम्बो ब्लॉक, तिन्ही मार्गावर होणार मोठे बदल, जाणून दिवसभराचे संपुर्ण वेळापत्रक)

जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंदूंच्या हत्यांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि राज्यातील जनता काश्मिरी पंडित आणि तिथे राहणाऱ्या हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. त्यांच्या म्हणण्यानुसार, काश्मीरमध्ये राहणार्‍या हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत ते करत राहतील.

महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या लक्ष्यित हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती अतिशय नाजूक आणि चिंताजनक बनली आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काश्मिरी पंडित आणि तिथे राहणार्‍या हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकार लवकरचं अनेक कठोर पावले उचलेल, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.