
एकाच पंख्याला गळफास लावून दोन मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
डोंबिवलीजवळ कोळेगाव येथे ही घटना घडली असून ऋतूजा आणि वर्षा अशी या मृत्यू मुलींची नावे आहेत. या प्रकरणी परिसरात खळबळ उडाली आहे. ऋतुजा ही वर्षाच्या घरी नेहमी झोपण्यासाठी येत होती. दररोजच्या प्रमाणे ऋतुजा आणि तिचा भाऊ वर्षाच्या घरी झोपण्यास गेले होते. मात्र पहाटे भावाला जाग आली तेव्हा त्याने या दोघींनी ओढणीने गळफास लावून घेतल्याचे पाहिले. तातडीने भावाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.
मानपाडा पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी पोहचून या दोन्ही मैत्रिणींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला. अद्याप या प्रकरणी कोणताही पुरावा सापडला नसून आत्महत्येमागील कारण काय असावे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.