Nashik Accident: नाशिकच्या निफाड तालुक्यात एकाच दिवशी दोन अपघात; चारचाकी वाहनांच्या धडकेत 2 दुचाकीस्वरांचा मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

नाशिकमध्ये (Nashik) दुचाकीस्वारांचे अपघात (Accident) सत्र थांबताना दिसत नाही. नाशिकमध्ये गेल्या महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यातच निफाड (Niphad) तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या (Pimpalgaon Baswant Police Station) हद्दीतील रानवड शिवारात आज आपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही अपघातात चारचाकी वाहनांच्या धडकेत दोन दुचाकीस्वरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात एकाच दिवशी दोन अपघाताच्या घटना घडल्या आहे. पहिल्या घटनेत आकाश सोमनाथ गिते यांचा (वय, 24) यांचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या घटनेत संदीप शिवराम रसाळ (वय, 32) यांनी आपला जीव गमावला आहे. या दोघांचा मृत्यू पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनांनी दिलेल्या धडकेमुळे झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केले आहे. हे देखील वाचा- Pimpri- Chinchwad: रस्त्याने जाणाऱ्या तरूणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, फूड डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, कारांजा लाड येथेही आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींनी एकमेकांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाले आहेत. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कारंजा ते मानोरा मार्गावरील वाकी फाट्याजवळील अडाण नदीपात्राजवळ घडली आहे. या घटेनत दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आहे.