Tushar Pundkar (Photo Credits: Facebook)

प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर (Tushar Pundkar) यांच्यावर झालेल्या गोळीबारात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.. शुक्रवारी रात्री दोन अज्ञात इसमांनी दुचाकीस्वारावरून रस्त्यावर उभे असलेल्या तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तेथून फरार झाले. त्यावर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. आकोट शहरातच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची गंभीर दखल घेच पालकमंत्री बच्चू कडू आकोट येथे दाखल झाले आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे त्यांच्या खुमकर दूध डेअरीच्या बाहेर शुक्रवारी रात्री 10-10.30 च्या सुमारास मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी दोन अज्ञात इसम दुचाकीस्वारावरून येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तुषार पुंडकर जागीच कोसळले. त्यामुळे काही कळण्याच्या आरोपींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेदेखील वाचा- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची निघृण हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरु

डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने या परिसरात खळबळ माजली असून येथे तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आकोट परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री बच्चू कडू हे आकोटमध्ये दाखल झाले आहेत.

या संदर्भात आकोट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.