Tree House | PC: Pixabay.com

मुंबई मध्ये आता पर्यटकांसाठी अजून एक आकर्षण पहायला मिळणार आहे. मलबार हिल मध्ये ट्री टॉप वॉकवे साठी 22 कोटीच्या प्रकल्पासाठी कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर आता वांद्रे पश्चिम (Bandra West) मध्ये ट्री हाऊस (Tree House) बांधलं जाणार आहे. याच्या द्वारा मुंबईतून अरेबियन सीचं विहंगम दृश्य पाहता येणार आहे. मंगळवार (4 जानेवारी) दिवशी बीएमसी (BMC) ने याबाबत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जारी केला आहे. हा अंदाजे 1 कोटींचा प्रकल्प आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला पालिकेचे असिस्टंट कमिशनर किरण दिघवकर यांनी दिलेल्या माहितीमध्ये वांद्रे किल्ल्याजवळ असलेलं गार्डन maritime board च्या अख्त्यारित असून त्यांच्याकडून नो ऑन्ब्जेक्शन सर्टिफिकेट्स घेतली जातील. बांधकाम हे प्रामुख्याने लाकडाचा वापर करून केलेलं असेल तर सिमेंट मर्यादित प्रमाणात वापरलं जाणार आहे.

पर्यटकांमध्ये ट्री हाऊस ही संकल्पना फार प्रसिद्ध आहे. मुंबई मध्ये ट्री हाऊस नसल्याने आता एक दुमजली ट्री हाऊस उभारलं जाणार आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरींनी DPDC कडून मुंबईच्या सुशोभिकरणामध्ये या प्रोजेक्टची मदत होईल असं सांगत परवानगी देण्यात आली आहे. पालिकेकडून फंड्स दिले जात आहेत. आणि वांद्रे परिसरात उभारल्या जाणार्‍या या प्रोजेक्टला मिळणार्‍या प्रतिसादाला पाहून इतर ठिकाणी अशाच प्रकारे ट्रीहाऊस उभारले जाऊ शकतात.

मुंबई मध्ये ट्री हाऊस उभारण्याची संकल्पना पर्यटन मंत्री आदित्या ठाकरे यांची आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई मध्ये हेरिटेज वॉक  द्वारा मुंबई बीएमसी कार्यालय इमारत पाहता येते.