Representational Image (Photo Credits: File Photo)

देशात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे (Coronavirus) रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 1,80,298 रुग्ण आढळले असून 8053 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यासोबत राज्यातील कारागृहांमध्येही (Prison) कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 363 कैद्यांसह 102 जेल कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असी माहिती महाराष्ट्र कारागृह विभागाने दिली (Maharashtra Prison Dept) आहे. यात आतापर्यंत 4 कैदी दगावले असल्याचे सांगण्यात आले आहेत.त्याचबरोबर 255 कैदी आणि 82 जेल कर्मचारी बरे झाल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे.

यात मुंबईतील कारागृहातही कोरोनाची लागण झपाट्याने होत असतानाचे चित्र दिसत आहे. मुंबई सेंट्रल जेलमध्ये आतापर्यंत 181 कैदी आणि 44 जेल कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 151 कैदी आणि 39 जेल कर्मचा-यांनी कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेदेखील वाचा- पुणे: येरवडा जेल मधून दोन कैदी फरार; सोशल डिस्टंसिंग साठी उभारलेल्या तुरुंगाच्या शौचालायच्या खिडकीचा घेतला फायदा

महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ अकोला, सोलापूर, औरंगाबाद कारागृहात सर्वधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तसेच राज्यात एकूण दगावलेल्या कैद्यांपैकी तळोजा कारागृहात 2 आणि येरवडा व धुळे जेलमध्ये प्रत्येकी 1 कैदी दगावल्याची माहिती कारागृह विभागाने दिली आहे. महाराष्ट्रातील कारागृहांपैकी कोणत्याही कारागृहात एकही जेल कर्मचारी दगावला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.