Nagpur: महिलेने आधी चार पुरूषांशी केले लग्न, नंतर पतींकडून खोटे आरोप लावत वसूल केली खंडणी
Arrest | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातून एका महिलेला तिच्या पुरुष जोडीदारासह अनेक मुलांशी लग्न करून त्यांच्याकडून खंडणी (Extortion) उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. भाविका मनवानी उर्फ ​​मेघानी दिलीप तिजारे आणि तिचा प्रियकर मयूर राजू मोटघरे अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.महिलांचे 2003, 2013, 2016 आणि 2021 मध्ये लग्न झाले होते. पतीविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करून त्यांच्याकडून पैसे उकळणे ही या महिलेची पद्धत होती. हेही वाचा World Press Freedom Index: भारता बनला 'मीडियासाठी सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक' देश; जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 150 व्या क्रमांकावर घसरण

जरीपटका येथील महेंद्र वनवानी यांच्या तक्रारीवरून महिलेला अटक करण्यात आली असून, गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी तिचा विवाह झाला होता. या महिलेने वानवानीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्याकडून 4 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.