AC local trains (Photo Credit: PTI)

ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या कार्यान्वित झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या (Central Railway) अंतर्गत आणखी वातानुकूलित लोकल ट्रेन (AC Local Train) चालवण्यात येणार आहेत. जागेच्या कमतरतेमुळे सध्या मध्य आणि हार्बर मार्गावर केवळ चार लोकल फेऱ्या आहेत. मध्य रेल्वेवरील नवीन रेल्वे सेवा भविष्यात फक्त एसी असतील आणि एसी लोकल ट्रेनच्या प्रवासी संख्येत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले. मध्य रेल्वे मुंबई उपनगरीय नेटवर्कवर 1774 लोकल ट्रेन चालवते. ज्यात 857 सेवा 10 AC लोकल ट्रेन सेवेसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, कर्जत आणि खोपोली या मुख्य मार्गावर धावतात. हेही वाचा  Bombay High Court मध्ये 247 क्लर्क पदासाठी नोकर भरती, अशा प्रकारे उमेदवारांना करता येईल अर्ज

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल 12 एसी सेवांसह एकूण 614 सेवा, ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर 262 यात 16 एसी सेवांसह तर बेलापूर सीफूड आणि उरण मार्गावर 40 गाड्या धावतात. दरम्यान, एसी लोकल ट्रेनसाठी ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर प्रवाशांची संख्या कमी असल्याने, या मार्गांवरील सेवा देखील मध्य मार्गावर हस्तांतरित करता येतील का याचा रेल्वे आढावा घेत आहे