First Batch Of Kesar Mangoes (फोटो सौजन्य - X/@DDNewslive)

First Batch Of Kesar Mangoes: यावर्षीच्या हंगामातील केशर आंब्यांची पहिली पेटी (First Batch Of Kesar Mangoes) आज मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC market in Mumbai) दाखल झाली आहे. कोकणातून आलेल्या यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असून याची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली. यंदा आंब्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्याकडून केशर आंब्याची ही पहिली पेटी दाखल झाली आहे. यंदा हापूसऐवजी केसर आंब्याच्या पेटीला एपीएमसी मार्केटमध्ये पहिला मान मिळाला आहे.

केसर आंब्याची पहिली पेटी मुंबईमधील APMC मार्केटमध्ये दाखल, पहा व्हिडिओ -