Lockdown काळात अल्पवयीन मुलांचे ऑनलाईन पॉर्न पाहण्याच्या संख्येत वाढ, आतापर्यंत सायबर क्राईमचे 133 गुन्हे दाखल
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या ऑनलाईन पॉर्न पाहणा-या लहान मुलांच्या संख्येत वाढ झाल्याचे सायबर गुन्हे विभागाच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात आतापर्यंत 133 गुन्हे दाखल करण्यात आले असून 46 जणांना IPC च्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने तसेच बाल लैंगिक अत्याचार, बाल गुन्हेगारी मध्ये वाढ होऊ म्हणून आम्ही काही कठोर पावले उचलत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी सांगितले आहे.

कोरोना मुळे परीक्षा रद्द झाल्याने लहान मुलांच्या सुट्टीचा कालावधी वाढला. या दरम्यान घर बसल्या मुलांना ऑनलाईन पॉर्न पाहण्याचे खुळं लागलय. ज्याचा परिणाम लॉकडाऊनच्या काळात बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करणा-या अल्पवयीन मुलांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे.

हेदेखील वाचा- Lockdown मुळे सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ; Porn Sites पाहणाऱ्यांना गंडा घालण्यासाठी वापरली जातेय 'ही' नवी ट्रीक

अलीकडेच महाराष्ट्र सायबर विभागाकडे आलेल्या तक्रारीच्या तपासात समोर आले की, काही हॅकर्सनी पॉर्न साईटच्या माध्यमातून लोकांना धमकावून पैसे उकळण्याचे काम सुरु केले आहे. ही मंडळी पॉर्नसाईटच्या अल्गोरिदम मध्ये व्हायरस टाकतात. यामुळे जेव्हा कोणीही ही साईट आपल्या डेस्कटॉप स्थवा मोबाईलवर सुरु करतं तेव्हा त्या व्यक्तीची माहिती, फोनमधील कॉन्टॅक्टस आणि आणि त्यांच्या डेस्कचा Acess हॅकर्सला मिळतो. तेव्हा पॉर्न बघत असतानाचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून नंतर हे फुटेज लीक करू अशी धमकी देत युजरकडून पैशांची मागणी केली जाते.