Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Bhiwandi Building collapsed: मुंबईतील भिंवडी परिसरात गौरीपाडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या दुर्घटनेत इतर स्थानिकांंनी मदत करुन चार जणांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  या घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशमाक दलाला देण्यात आली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिंवडीतील गौरीपाडा येथे दोन मजली इमारतीच्या मागचा भाग कोसळला. या दुर्घटनेत अनेक स्थानिक लोक अडकले. इमारतीच्या ढिकाऱ्याखाली दबले आहेत. या घटनेनंतर इतर स्थानिकांनी चार जणांना बाहेर काढले. तात्काळ अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव कार्यांच्या मदतीने कार्य सुरु झालं. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सहा जण अडकल्याची माहिती मिळाली. बचाव कार्याच्या मदतीने सहा जणांना इमारतीच्या ढिगाऱ्या खालून काढण्यात आले परंतू  या घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. आणि चार जणांना गंभीर जखमा झाल्याची माहिती मिळाली.

जखमींना इतर स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी एकाची प्रकृती खराब असल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिंवडी परिसरातील ही इमारत ४० वर्ष जुन्या आहे.  इमारतीना दोन वेळा नोटीसा बजावण्यात आले होते. इमारत धोकादायक असताना देखील या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम महानगरपालिकेचे होतं, परंतु हे काम झाले नाही त्यामुळे आज दोन नागरिकांचा जीव धोक्यात गेला.