
ठाणे शहर पोलिसांनी 5 एप्रिल ते 20 एप्रिल माजिवाडा फ्लायओव्हर वाहतूकीसाठी रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेत बंद ठेवला जाणार असल्याची माहिती दिली आहे. मेट्रो स्टेशन कंस्ट्रक्शन साईट वर छप्पर टाकण्याच्या कामासाठी वाहतूकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे ट्राफिक विभागाच्या माहितीनुसार, कापूरबावडी वाहतूक उपविभागातील माजीवाडा मेट्रो स्टेशनवरील मेट्रो स्टेशनच्या छतासाठी खांब उभारले जातील. या खांबांवर जॅक बीम बसवले जातील आणि जॅक बीम बसवल्यानंतर, राफ्टर्स उभारले जातील. अशी माहिती देण्यात आली आहे.
ठाण्यात हे काम सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचाच एक भाग आहे आणि स्टेशनच्या छताच्या संरचनेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम स्थापनेसाठी हे वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ठाण्यात हे काम सुरू असताना मुंबई-नाशिक-घोडबंदर माजीवाडा पुलाच्या मुख्य जलवाहिनीवर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ होणार आहे. परिणामी, मुंबई-नाशिक आणि घोडबंदर रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. वाहतूक विभागाने यावर भर दिला की परिसरातील गर्दी टाळण्यासाठी आणि जनतेच्या सोयीसाठी सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे उपाय आवश्यक आहेत.
ठाणे पोलिसांची माहिती
कापूरवाडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत माजीवाडा मेट्रो स्टेशन या ठिकाणी दि. ०५/०४/२०२५ ते २०/०४/२०२५ पर्यंत (रूफ मेट्रो स्टेशनचे) उभारण्यासाठी कॉलम उभारणार आहेत. माजीवाडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक व घोडबंदर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे प्रवेश बंद व पर्यायी मार्ग. pic.twitter.com/7Ec1G2YyW8
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) April 4, 2025
पहा काय आहेत पर्यायी मार्ग?
मुंबईहून घोडबंदर किंवा भिवंडीला जाणाऱ्या माजिवडा फ्लायओव्हर ब्रिजवरून ज्युपिटर जंक्शन मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना विवियाना मॉलसमोरील पुलाच्या चढाईच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. पर्यायी मार्गावरील वाहने ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील स्लिप रोडने सरळ पुढे जातील आणि कापूरबावडी सर्कलमार्गे पुढे जाणार आहे. मुंबईहून माजिवडा पुलावरून ज्युपिटर जंक्शनमार्गे नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना विवियाना मॉलसमोरील पुलाच्या चढाईच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील स्लिप रोडने सरळ पुढे जाईल आणि गोल्डन क्रॉस मार्गाने पुढे जाता येणार आहे.