ठाण्यामध्ये (Thane) एका 32 वर्षीय डॉक्टराचा बलात्काराच्या (Rape Case) आरोपामध्ये जामीन फेटाळण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता. दरम्यान एका महिलेला लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. जामीन दिल्यास आरोपी पुराव्यांची छेडछाड करू शकतो. त्यामुळे तपासाचा टप्पा, गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता, जामीन मंजूर करता येणार नसल्याचं मत Additional Sessions Judge Premal S Vithalani यांनी दिलं आहे.
"प्रत्येक जामीन अर्जावर विशिष्ट प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती यांचा अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक आहे. जामीन अर्ज मंजूर करताना किंवा फेटाळताना straitjacket formula असू शकत नाही," असेही त्यांनी म्हटलं आहे.
आरोपी डॉक्टर आणि 27 वर्षीय महिला यांची 2017 मध्ये भेट झाली होती. 2020 मध्ये त्यांचा लग्न करण्याचा निर्णय झाला होता. पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये एप्रिल 2024 मध्ये महिलेने पोलिसांत तक्रार केल्याचं म्हटलं आहे. त्यामध्ये बलात्काराचा समावेश करण्यात आला आहे. एप्रिल 24 मध्ये कोर्टाने जामीन नाकारला होता. त्यावेळी अटकपूर्व जामीनाचा अर्ज होता. आरोपीला पोलिसांनी 7 मे दिवशी अटक केली आहे.
फिर्यादीने डॉक्टरच्या जामीन अर्जाला विरोध केला आणि आरोप केला की त्याने लग्नाचे खोटे वचन देऊन माहिती देणाऱ्याचे शोषण केले आणि तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमक्या दिल्या. कोर्टाने मोबाइल फोन रेकॉर्ड आणि माहिती देणाऱ्याच्या वकिलाने सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगसह पुराव्यांची देखील माहिती घेतली आहे.
प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता आरोपी जामीन देण्यास पात्र आहे की नाही हे पाहावे लागेल. शारीरिक संबंधासाठी माहिती देणाऱ्याची संमती होती यात शंका नाही. आरोपीच्या वकिलाने जवळीक दर्शविणारी अनेक छायाचित्रे रेकॉर्डवर ठेवली आहेत," असे न्यायालयाने म्हटले आहे. तर, आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याने आणि लैंगिक कृत्यांचे फोटो आणि व्हिडिओ बनविण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. "निश्चितपणे, अशी संमती कायद्यानुसार वैध संमती आहे असे म्हणता येणार नाही." असे मत नोंदवण्यात आले आहे.