ठाणे: युगांतर प्रतिष्ठान आयोजित आरोह व्याख्यानमालेस नागरिकांचा उत्स्फूर्थ प्रतिसाद
Aaroha Vyakhyanmala of Yugantar Pratishthan

युगांतर प्रतिष्ठान (Yugantar Pratishthan) आयोजित आरोह व्याख्यानमालेस (Aaroha Vyakhyanmala) ठाणे शहरातील नागरिकांकचा उत्स्फूर्थ प्रतिसाद पाहायला मिळाला. यंदा या व्याख्यानमालेचे सातवे वर्ष होते. व्याख्यानमालेसाठी यंदा Fitness- More of a craze, Less of a lifestyle हा विषय निवडण्यात आला होता. या विषयांतर्गत स्पोर्ट्स सायंटिस्ट तनुजा लेले आणि प्रसिद्ध आहारतज्ञ विक्रम मेहेंदळे यांनी उत्तम Fitness, योग्य आहार, निरोगी आयुष्य कसं जगावं यांसह इतरही मुद्द्यांना स्पर्ष करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर, कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाचे दुसरे सत्र रंगले.

युवकांमध्ये साहित्य, कलाकृती, आरोग्य, विज्ञान, समाज आणि संस्कृती आदी घटकांविषयी जाणीव विकसीत व्हावी. युवकांमध्ये ही जाणीव उत्तरोत्तर वाढत जावी यासाठी युंगात प्रतिष्ठा प्रतिवर्ष आरोह व्याख्यानमालेचे आयोजन करते. कार्यक्रमाची सुरुवात एका लघू नाटिकेने झाली. दरम्यान, Fitness- More of a craze, Less of a lifestyle या विषयावर बोलताना स्पोर्ट्स सायंटिस्ट तनुजा लेले आणि प्रसिद्ध आहारतज्ञ विक्रम मेहेंदळे यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर आणि मल्टि इंस्ट्रुमेंटलिस्ट मधुर पडवळ यांची संस्था अध्यक्ष कौस्तुभ बांबरकर यांनी मुलाखत घेतली. मुलाखतीच्या माध्यमातून कॉर्पोरेट किर्तन, कॉर्पोरेट वाटचाल आणि कॉर्पोरेट युगात यशस्वी होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, ध्येय आणि आर्थिक उन्नती आदी मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. यावेळी मधुर पडवळ यांनी भारतातल्या विविध प्राचीन वाद्यांचं प्रेक्षकांना प्रात्यक्षिकही घडवलं.