Raj Thackeray and Tejaswini Pandit | (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल (Assembly Election Results 2024) लागला. ज्यामध्ये सत्ताधारी महायुती पुन्हा एकदा केवळ बहुमतच नव्हे तर मोठ्या मताधिक्याने विजयी झाली. तर महाविकासआघाडी पूर्ण पराभूत झाली. यात मोठ्या अपेक्षा आणि गाजावाजा असलेला राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष तर सपशेल आपटला. मनसेच्या या पराभवानंतर अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत (Tejaswini Pandit) यांनी सोशल मीडियात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. राज यांना समर्थन देताना त्यांनी 'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू' अशी भावना व्यक्त केली आहे.

कोण? कसं ? आणि काहीज

अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला १००/१००. पण तरीही. राजसाहेब ठाकरे. सोबतच त्यांनी #एकनिष्ठ, #सदैवसोबत हे हॅशटॅग जोडतानाच 'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू', अशी टिप्पणीही केली आहे. (हेही वाचा, Tejaswini Pandit On Bikinis: स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालणार नाही मग कुठे घालणार? कपड्यावरुन केलेल्या विधानामुळे तेजस्विनी पंडीत चर्चेत)

चाहत्यांकडूनही मजेशीर प्रतिक्रिया

अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत या राज ठाकरे यांच्या आणि त्यांच्या मनसे पक्षाच्या समर्थक मानल्या जातात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुनही ते पाहायला मिळते. दरम्यान, पंडीत यांनी केलेल्या पोस्टवर त्यांचे चाहतेही प्रतिक्रिया देताना दिसतात. अर्थात या प्रतिक्रियांमध्ये सर्वच चाहते आहेत अशातला भाग नाही. काहींनी त्यांच्या पोस्टला विरोध दर्शवणारी किंवा त्यांची खिल्ली उडवणाऱ्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी प्रतिक्रिया देताना अर्वाच्च भाषा वापरली आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनीही विधानसभा निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: अमोल खताळ ते स्नेहा पंडित दुबे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये जायंट किलर पहा कोण कोण ठरले)

तेजस्वीनी पंडीत यांची राजकीय पोस्ट

राज ठाकरे यांचे विधानसभा निकालावर भाष्य

एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, लय बेकार वाईट वाटत आहे यार आज! एक जरी आली असती तरी अभिमानाने सांगितलं असत आमचा आलंय आता काय? दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही,पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही! सदैव राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत. आणखी एकाने म्हटले आहे की, वाईट वाटते.. चांगली संधी सोडली. आधी पासून तयारी केली नाही.. जमिनीवर लोक बांधले नाही. बिनशर्त पाठिंबा द्यायची गरज नव्हती. एका चाहत्याने राजकीय विश्लेषण करत म्हटले आहे की, 2019 ची लोकसभा न लढवण्याचा निर्णय, त्यानंतर 2024 ला बिनशर्त पाठिंबा ह्याने कार्यकर्ता सैरभैर झाला होता. त्यासाठी 4 महिन्या आधी ससंघटन मजबूत करायला हवे होते आणि मोजक्याच ठराविक 5-10 युतीत लढायला हव्या होत्या. आता तरी जागे व्हा आणि संघटन मजबूत करा.