Mumbai Local | (File Image)

वाशी ठाणे मार्गावर लोकल (Vashi Thane Local) ट्रेनला काही तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील (Trans-Harbour Train Services) वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी ठाणे स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वाहतूक पुर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. दरम्यान, सकाळच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळची वेळ ही महत्त्वाची असते मुंबई आणि मुंबई उपनगरातील लोक कामानिमित्त आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालेले असतात. अशा वेळी अशी घटना घडली तर त्याचा कामावरही परिणाम होतो.

दरम्यान, प्रवाशांच्या माहितीसाठी असे की, ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग वाहतूक विस्कळीत झाली असली तरी, ज्या प्राशांना ठाणे ते वाशी दरम्यान प्रवास करायचा नाही अशा प्रवाशांना मध्य रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. हे प्रवासी ठाणे रेल्वेस्टेशनवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनजकडे जाणारी कोणतीही लोकल पकडून कुर्ला रेल्वे स्टेशनला उतरु शकतात. कुर्ला रेल्वे स्टेशनवरु हे प्रवासी हार्बर रेल्वे मार्गाचा वापर करुन वाशीच्या पुढील प्रवास करु शकतात. (हेही वाचा, Mumbai Airport BEST Bus Services: मुंबई विमानतळ बससेवेसाठी 'बेस्ट'ने सुरु केली 'आसन आरक्षण' सेवा)

दुसऱ्या बाजूला मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करुन ठाणे येथून ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना दादर अथवा कुर्ला येथून हार्बर रेल्वे मार्गाचा वापर करुन तुर्भे, वाशी आणि पुढे पनवेलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

दरम्यान, कळवा, ठाणे, ऐरोली येथून आणि कोपरखैरणे वैगेरे भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्तेवाहतूक हा पर्याय स्वीकारण्याखेरीज पर्याय नाही.