भंडारा: आणखी एका वाघिणीचा मृतदेह सापडला; दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (Photo credits: Pixabay, skeeze)

भंडारा जिल्ह्यातील उमरेड अभयारण्यात (Umred Sanctuary) आज (सोमवार, 31 डिसेंबर)  एका वाघिणीचा मृतदेह सापडला आहे. कालच या ठिकाणी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. सलग दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वन विभागाच्या शोध मोहिमेत वाघिणीचा मृतदेह आढळून आला. 'टी 4' असे या मृत वाघिणीचे नाव आहे. वाघिणीच्या मृतदेहाशेजारीच मृत डुक्कराचे अवशेषही सापडले आहेत.

काल उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चार्जर वाघाचा मृत्यूदेह सापडला होता. 'चार्जर' हा 'जय' या वाघाचा बछडा होता. या दोन्ही वाघांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.