महिला स्त्री सक्षमीकरणासाठी नेहमीच आघाडी वर असणार्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा सोशल मीडीयात अजून एक व्हिडीओ वायरल होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना 'विधवा' (Widow) म्हणून पाहून शुभ प्रसंगामध्ये टाळलं जातं. पूजेत मानाच्या विधींमध्ये डावललं जातं. हळदी-कुंकू, केसात गजरा, ओटी भरण्याचे कार्यक्रम यापासून दूर ठेवलं जातं. पण सुप्रिया सुळेंनी काल एका कार्यक्रमामध्ये विधवा स्त्री कडून हळदी कुंकू लावून घेऊन आणि तिलाही लावून तिचा यशोचित सन्मान केला. थरथरत्या हातानी कुंकू लावताना त्यांनी महिलेला दिलेला आधार देताना त्याही भावूक झाल्या होत्या. सोशल मीडीयात त्यांनी या हृद्य प्रसंगाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे काल उस्मानाबाद मध्ये असताना त्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. वसंतरावाच्या मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या सुनबाई काल सुप्रिया सुळेंसमोर आल्या. तेव्हा त्यांनी आपल्या सुनेला आधार देत सुप्रिया सुळेंना हळदी कुंकू लावण्याचा आग्रह केला. यानंतर सुप्रिया सुळेंनीही वडीलांसारखी माया करणार्या सासर्यांच्या पाया पडण्यास सांगितले. या प्रसंगावर एक एक पोस्ट देखील लिहली आहे. नक्की वाचा: कोल्हापूरच्या टाकळवाडीमध्ये विधवांच्या हस्ते मंदिराची वास्तुशांतीची पूजा; अनिष्ट प्रथांना छेद देणारं अजून एक क्रांतिकारी पाऊल .
सुप्रिया सुळे पोस्ट
View this post on Instagram
सुप्रिया सुळे यांनी पोस्ट मध्ये 'आयुष्यभराचा जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख खुप मोठं आहे. पण त्यामुळे आयुष्य थांबू नये. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तो भरभरुन जगण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबियांनी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे.' असं म्हटलं आहे.