मराठी तसेच इंग्रजीमधील ख्यातनाम प्रकाशन संस्था म्हणून मेहता पब्लिशिंग कंपनीचे नाव घेतले जाते. आता माहिती मिळत आहे की, मेहता पब्लिशिंगचे संचालक आणि प्रकाशक सुनील मेहता यांचे दुःखद निधन झाले आहे. आज, बुधवारी दुपारी 4 वाजता त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुना हॉस्पीटलमध्ये मुतखड्यावरील उपचार सुरु होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचे एक एक अवयव निकामी होत गेले. गेली दोन दिवस ते व्हेंन्टिलेटरवर होते व आज त्यांची प्राणज्योत मालवली.
मेहता पब्लिशिंगचा वृक्ष गगनावर घेऊन गेलेल्या मित्रवर्य सुनील मेहतांचे असे अचानक जाणे धक्कादायक आहे. या तडफदार प्रकाशकाच्या मृत्यूने मराठी ग्रंथव्यवहाराची अपरिमित हानी झाली आहे. हे दु:ख सहन करण्याची ताकद परमेश्वर अनिलभाई व कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना🙏🏻ॐ शांती #मेहता_पब्लिशिंग pic.twitter.com/dk7q7aIfao
— rajiv khandekar (@rajivkhandekar) January 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)