नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात (Nagpur District Bank Scam) काँग्रेस नेते (Congress Leader) सुनील केदार (Sunil Kedar)यांना न्यायालयाने सुनावलेली 5 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात शिक्षा निलंबित करून जामीन मिळावा आणि दोषसिद्धी स्थगिती निर्णयावर आज निकाल लागला. सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान केली होती. तर, सरकारी वकिलांनी याला विरोध केला होता. हे प्रकरण लोकांच्या पैशाशी संबंधित प्रकरण आहे. रिझर्व्ह बँक, सेबी आणि सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा - Sunil Kedar Hospitalised: सुनील केदार हॉस्पिटल मध्ये दाखल; डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याच्या समस्या)
नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणांमध्ये सुनील केदार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांनी नकार दिला आहे. सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला स्थगितीच्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आज निर्णय सुनावला. 22 डिसेंबर रोजी न्यायालयाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
या घोटाळ्यात 20 वर्षांपूर्वीची 153 कोटी रुपयांची रक्कम गुंतलेली आहे. हजारो शेतकऱ्यांचा तो पैसा होता आणि घोटाळ्यामुळे नंतरच्या काळात हजारो शेतकरी अडचणीत आले. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आणि या प्रकरणात असलेले पुरावे लक्षात घेता आरोपींना जामीन देणे चुकीचे ठरेल असे निरीक्षण आज जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले