वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बांधली राखी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

मोटार वाहन सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर झाले आहे. यामुळे आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर आता कडक कारवाई होणार आहे. आज भारताचा स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी प्रवाशांना विद्यार्थिनींनी राखी बांधल्या. अशा अनोख्या उपक्रमाद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांना शिकवण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट ते तुर्भे या रोडदरम्यान वाहतूक पोलिसांनी (New Mumbai Traffic Police) हा कार्यक्रम राबविला.

सरकारने वाहतुकीचे नियम फार कडक केले आहेत, मात्र तरी बिना हेल्मेटवाले दुचाकीस्वार आणि सिटबेल्ड न लावणाऱ्या चारचाकी, सिग्नल तोडणारे लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. अशाप्रकारे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी, एपीएमसी, तुर्भे वाहतूक पोलिस झणी शाळकरी विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना त्यांनी राखी बांधल्या.

या उपक्रमाचे शहरात फार कौतुक होत आहे. दरम्यान, मोटार वाहन सुधारणा विधेयक 2019 आजपासून लागू झाले आहे. याद्वारे वाहतुकीचे नियम मोडल्यास आधीपेक्षा दहापट दंड ठोठावण्यात येणार आहे. अँम्बुलन्सला रस्ता ण दिल्यास दहा हजार, विना परवाना गाडी चालवत असल्यास 5 हजार, परवाना निलंबित झाले असल्यावरही वाहन चालवत असेल तर 10 हजार, अतिवेगाने गाडी चालवत असल्यास 1 हजार, दारू पियुन गाडी चालवत असल्यास 10 हजार अशा प्रकारे दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.