Eknath Shinde (Photo Credits: Wikipedia Facebook)

मुंबई-गोवा प्रवास करणा-या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई-गोवा एक्सप्रेस वे हा नवीन महामार्ग लवकरच सुरु करण्यात येणार असून यामार्गाने केवळ 5 तासांत मुंबई-गोवा प्रवास पार करता येणार आहे. ऐकून धक्का बसला ना! पण हे खरं आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किमी लांबीचा एक्सप्रेस-वे तयार केला जात आहे. यामुळे हा प्रवास काही तासांमध्येच पूर्ण करता येणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर मुंबई –गोवा एक्सप्रेस-वे योजनेची घोषणा शनिवारी करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. शनिवारी म्हणजेच 14 मार्चला झालेल्या अप्पर हाऊसमध्ये याबाबत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता लवकरच मुंबई-गोवा प्रवास केवळी 4-5 तासांत पूर्ण करता येणार आहे. मुंबई गोवा प्रवास आता आलिशान क्रुझमधून...

तसेच मुंबई - नागपूर (Mumbai – Nagpur) समृद्धी महामार्गाच्या (500 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे) पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना आखण्यात येणार आहे. सध्या या प्रवासात 11 ते 13 तासांचा वेळ जातो.

यासंदर्भात MSRDC ने या प्रकल्पादरम्यान निसर्गाला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशा स्वरुपाच्या प्रकल्पाच्या अहवालाची मागणी केली आहे. मुंबई – गोवा एक्सप्रेस-वे तयार करताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील अहवाल तयार करण्यात येणार आहे.

या एक्सप्रेस वे मुळे कोकण भागातील पर्यनटाच्या क्षेत्रात वाढ होईल. परिणामी स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि पर्यटकांना कोकण किनारपट्टीचा आनंद घेता येईल. तसेच आयात-निर्यातही अगदी सहजपणे करता येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.