महाराष्ट्रामध्ये दहावी(SSC), बारावी (HSC) च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या MSBSHSE बोर्ड परीक्षेच्या निकालाचे वेध लागले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार सध्या बोर्डाच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्यातच दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. पुढील आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागण्याचा अंदाज आहे तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो. विद्यार्थ्यांना आपला दहावी, बारावी चा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान यंदा महाराष्ट्रात बारावी च्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान झाल्या आहेत तर दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च झाल्या आहेत. या दोन्ही परीक्षेत सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाकडून जाहीर केला जाणार आहे. Maharashtra Board HSC Result 2024: MSBSHSE कडून लवकरच जाहीर होणार 12वीचा निकाल mahresult.nic.in वर; विद्यार्थ्यांना बोर्डाकडून तारखेच्या घोषणेचे वेध!
निकाल ऑनलाईन कसा पहाल?
बारावीचा निकाल / दहावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी/ 10वी निकालाचा पर्याय निवडा.
आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
त्यापुढे View Result वर क्लिक करा.
तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
मागील वर्षी बारावीचा निकाल 91.25% लागला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो जाहीर करण्यात आला होता. तर 10 वी चा निकाल 2 जून दिवशी लागला होता. 93.83%विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले होते. बोर्ड परीक्षेच्या निकालावर विद्यर्थ्यांना करियरचे पुढील निर्णय घ्यायचे असतात त्यामुळे ICSE, CBSE चे निकाल लागलेले असताना महाराष्ट्रात बोर्डाचे निकाल देखील वेळेत लावले जातील.