नोकरीनिमित्त मुंबईकरांना लोकल, मेट्रो असा बराच प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या बराच वेळ प्रवास जातो. ऑफिसच्या वेळा, काम आणि प्रवास यामुळे स्वत:साठी, कुटुंबासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळत नाही. पण मुंबईकरांचे धावपळीचे जीवनमान काहीसे रिक्लॅस करण्याचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) चा मानस आहे. त्यामुळे त्यांनी मेट्रो स्टेशन्सवर सलून आणि स्पा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर प्रवाशांसाठी सुपर मार्केट, फुड प्लाझा, बँक आणि फार्मसी या सुविधा देखील मेट्रो स्टेशनवर सुरु करण्याची एमएमआरसीएलची योजना आहे. तसंच मेट्रो-3 कॉरिडोरच्या प्रवाशांना या सर्व सुविधा मेट्रो स्टेशनवर मिळाव्यात यासाठी मेट्रो स्टेशन्सचे डिझाईन देखील त्याचप्रमाणे तयार केले जात आहे. (खुशखबर! दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई मेट्रो सुरु करणार 'ट्रॅव्हल हेल्पडेस्क' जेथे पाल्यासह पालकांना मिळणार 'ही' विशेष सुविधा)
कफ परेड, सिद्धिविनायक, बीकेसी आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट स्टेशन यावर 20-40 स्क्वेअर फूट जागा या सुविधांसाठी राखीव ठेवण्यात येईल. तर इतर स्टेशन्सवर 300-1000 स्क्वेअर फूटच्या जागेत सुपर मार्केट, फुड प्लाझा यांच्यासह अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
मुंंबई मेट्रो स्टेशनवर मिळणाऱ्या सुविधा:
# बँक
# एटीएम,
# फूड स्टॉल
# फूड मार्केट
# फार्मसी
# सुपर मार्केट
# स्पा
# सलून
एमएमआरसीएल नुसार, ज्या मेट्रो स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते त्या ठिकाणी सलून, स्पा, फूड स्टॉल, एटीएम, सुपर मार्केट, फूट कोर्ट, बँक, फार्मेसी यांसारख्या सुविधा देण्यात येतील. मुंबईतील गतिमान जीवनाची गती सांभाळण्यासाठी या सुविधा प्रवाशांना नक्कीच फायदेशीर ठरतील.