आंतरजातीय विवाहाला विरोध करणारा समाज अजूनही देशाच्या काही भागात पाहायला मिळतात. मग त्यावेळी हत्या, जीवेमारण्याची धमकी देणे यांसारखे अनेक प्रकार घडतात. पण चंद्रपूरात (Chandrapur) याउलट एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे जावयानेच आपल्या सास-याची हत्या करुन सासूवर जीवघेणा हल्ला केला आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात सास-याचा जागीच मृत्यू झाला असून आणि आरोपीची पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले आहे. सावली तालुक्यातील हिरापूर येथे ही घटना उघडकीस आली आहे. यात आरोपी निलकंठ कांबळे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आंतरजातीय विवाह केल्यामुळे होत असलेल्या नेहमीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जावयाने केलेल्या या हल्ल्यात सासऱ्याची हत्या तर सासू व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ईश्वर मडावी (55) असं मृताचे नाव असून त्यांच्या दोन पत्नी कौशल्या ईश्वर मडावी (50), यामिना ईश्वर मडावी (45) गंभीर जखमी झाल्या असून आरोपीची पत्नी मनिषा कांबळे (24) हे देखील गंभीररित्या जखमी झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- धक्कादायक! सासूकडून एनआरआय सुनेची हत्या; पोलिसांत कबूली देण्यासाठी नेला हात कापून
निलकंठ कांबळे (27)असं आरोपी जावयाचं नाव आहे. हत्या केल्यानंतर तो फरार झाला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या घटनेचा पोलीस तपास सुरू असून आरोपीचा कसून शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. दरम्यान, या जखमींची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सोमवारी (16 डिसेंबर) ला अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली. यात सासूने आपल्या मुलासह लग्न करुन त्याला अमेरिकेत राहायला घेऊन गेलेला सूनेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना मुंबई (Mumbai) येथील वसई (Vasai) परिसरात घडली. सासूने आपल्या सुनेचा खून करुन कबूली देण्यासाठी मृतदेहाचा हात कापून स्थानिक पोलिस ठाण्यात घेऊन गेली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीची कसून चौकशी करत आहे. संबधित महिला झोपेच्या गोळ्या खाऊन पोलीस ठाण्यात पोहचली होती. त्यामुळे काही काळानंतर तिची प्रकृती ढासळली. यामुळे तिला पोलिसांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.