Shri Siddhi Vinayak Ganapati (Photo Credits: Twitter)

दिवाळीची वाट पाहता पाहता दिवाळी आली देखील. आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. धनतेसरच्या निमित्ताने सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराकडूनही धनतेरसच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आज धनत्रयोदशी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या मुर्तीला छान फुलांची आरास करण्यात आली आहे. बाप्पासमोर दिवे लावून दीपावलीतील हा पहिला दिवस सण खास करण्यात आला आहे. श्री सिद्धिविनायक मंदिरातर्फे बाप्पाचा फोटो शेअर करत धनतेसरच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कोविड-19 संकटामुळे राज्यातील मंदिरं अद्याप बंद आहेत. परंतु, डिजिटल युगात सोशल मीडिया माध्यमातून देवाचे दर्शन घेणे शक्य होते. दिवाळीनिमित्त घरबसल्या आपण बाप्पाचे दर्शन करु शकतो, हे देखील कमी नाही. बाप्पा भोवती केलेली सुंदर सजावट मन प्रसन्न करते, यात कोणतंही दुमत नाही. (जाणून घ्या धनत्रयोदशीचे महत्त्व)

पहा फोटो:

धनत्रयोदशी निमित्त समुद्रमंथनातून निघालेल्या धन्वंतरी या विष्णुच्या अवताराची पूजा केली जाते. आज धन्वंतरी जयंती असल्याने आजचा दिवस 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणून देखील साजरा केला जातो. आपल्याकडे धनत्रोयदशी निमित्त सोने, नवी वस्तू खरेदी केली जाते. तसंच आजच्या दिवशी अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी यमदीपदान करण्याची पद्धत आहे.