Ambegaon Assembly Election 2024 Result: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा 1100 मतांनी विजयी झाला आहे. शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक (Ambegaon Assembly Election 2024) अत्यंत चर्चेची झाली असून यामध्ये अवघ्या 1100 मतांनी दिलीप वळसे पाटील यांना विजय मिळाला आहे. आंबेगाव मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देवदत्त निकम (Devdutt Nikam) आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये लढत होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांचा दिलीप वळसे पाटील यांच्यावर मोठा रोष होता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील सक्रिय राहिले नव्हते. ते आजारी असल्याने त्यांनी प्रचार देखील जास्त प्रमाणात केला नव्हता, म्हणून चर्चांना उधाण आले होते. परंतु लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचार सभांचा झंजावात करून देवदत्त निकम यांचा पराभव करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. (हेही वाचा -Shevgaon-Pathardi Vidhan Sabha Election 2024 Result: भाजप आमदार मोनिका राजळे यांना धक्का! शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले 4720 मतांनी आघाडीवर)
विजयानंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया -
दिलीप वळसे पाटील यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. हा महायुतीचा विजय असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मेहनत घेतल्यामुळेच हा विजय होऊ शकला, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणारा आंबेगाव मतदारसंघ पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांना आपल्याकडे ठेवण्यात यश आले असून त्यांच्याकडे यापूर्वी सहकार मंत्री म्हणून जबाबदारी होती. (हेही वाचा -Paithan Vidhan Sabha Election 2024 Result: पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट उमेदवार विलास भुमरे 14 हजार मतांनी आघाडीवर)