Shivshahi bus catches fire (फोटो सौजन्य -X,@RahulAsks)

Shivshahi Bus Caught Fire: अमरावतीहून (Amravati) यवतमाळ (Yavatmal) ला जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर, चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि काही वेळातच बसने पेट घेतला. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, बडनेरा ते यवतमाळ रस्त्यावरील माहुली चोर गावाजवळ ही घटना घडली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवशाही बस अमरावती बसस्थानकावरून निघाली तेव्हा माहुली चोर गावाजवळ येताच केबिनमधून धूर येऊ लागला. यानंतर, चालकाच्या हे लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर, बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि बस पेटू लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर @RahulAsks या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा -Bus Driver Watching Cricket Match While Driving: गाडी चालवताना मोबाईलवर क्रिकेट सामना पाहणं बस चालकाला पडलं महागात; MSRTC कडून ड्रायव्हर बडतर्फ)

पहा व्हिडिओ - 

 

शिवशाही बसला आग -

दरम्यान, अमरावती यवतमाळ रस्त्यावर नेहमीच वाहतूक असते. या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी ही आग पाहण्यासाठी अनेक लोक जमले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. (हेही वाचा -Policeman Assaults PMPML Bus Driver: पोलिस कर्मचाऱ्याची पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण, पहा व्हिडिओ)

चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले सर्व प्रवाशांचे प्राण -

या घटनेनंतर, चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. गेल्या वर्षी अकोलाहून अमरावतीला जाणाऱ्या शिवशाही बसचा बडनेरा ते अमरावती रस्त्यावर अपघात झाला होता. यावेळी टायर फुटल्याने बसने पेट घेतला.