Samna | (File Image)

कोरोना मुळे देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला असून हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. देशातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे तीन वेळा हे लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. सोमवारी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधला. देशातील सद्य परिस्थिती आणि 17 मे नंतर काय? या विषयावर चर्चा झाली. मात्र हे लॉकडाऊन वाढवत राहणे हा उपाय नसून देशातील आणि महाराष्ट्रातील परिस्थितीचा उहापोह करत येणाऱ्या संकटांची जाणीव सामनाच्या अग्रलेखातून सरकारला करुन देणयात आली आहे. राज्यकर्त्यांनी आधी कोरोनाचे भजन थांबवून कोरोनाच्या तिरडीवरुन उठायल हवं असं शब्दांत या अग्रलेखातून सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून Lockdown Extension आणि सरकारची भूमिका यावर जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे. या अग्रलेखातून सरकारला अनेकप्रश्न विचारण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- ठाणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील संपूर्ण विभाग आज रात्री 12 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहणार

“करोनाचा फास त्यांच्या गळ्याभोवतीही आवळलेलाच आहे. विनाअनुदानीत शाळांतील हजारो शिक्षकांना दोन महिन्यांपासून त्यांचे तुटपुंजे वेतनही मिळू शकलेले नाही. घरेलू कामगारांची अवस्था त्याहून बिकट आहे. या वर्गास कोणीच वाली नाही. घरकाम करणार्‍या ‘बाया’ झोपड्या किंवा चाळीत राहतात. त्यांना आता इतर निवासी संकुलात प्रवेश बंदी आहे व त्यांनी कितीकाळ मोफत धान्याच्या रांगेत उभे राहायचे?" असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मोदींचे व महाराष्ट्राचे सरकार खंबीर आहे वगैरे ठीक, पण जनतेचा धीर सुटणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा लोकांच्या संतापाला तोंड देणे कठीण होईल. लोकांचे पगार, पेन्शन वगैरे थकले आहेत. भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेवींवर देण्यात येणार्‍या व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे व्याजावर गुजराण करणार्‍या लोकांचेही हालच होतील, असे सांगून भविष्यातील स्थितीवरही भाष्य केले आहे. लोकांना आजच जगायचे आहे. त्यांना उद्याचा हवाला नको. ‘आता कशाला उद्याची बात, बग उडूनि चालली रात’, अशी अवस्था सगळ्यांचीच झाली आहे.

लॉक डाऊननंतर होणारी उपासमारी, आर्थिक दुरावस्था यामुळे घरांत, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनीही ‘कोरोना’चे भजन थांबवायला हवे. सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे. लोक आपोआप कामधंद्याला लागतील! ‘लॉक डाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? याचे उत्तर कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच जनतेला मिळावे!,” असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.