Aamshya Padavi Joins Eknath Shinde's Sena: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेवर नियुक्त केलेले शिवसेना (UBT) आमदार आमश्या पाडवी (Aamshya Padavi) यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी पाडवी यांचे शिंदे गटात स्वागत केले. आमश्या पाडवी हे नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा आदिवासी चेहरा आहे. ते गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व जोमाने प्रस्थापित करत आहेत.
2022 च्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांना बाजूला सारले होते आणि विधान परिषदेसाठी आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली होती. या कारवाईमुळे इतर पक्षातील सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडात 40 आमदार सामील झाले, तरी पडवी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. मात्र, पाडवी यांनी आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. (हेही वाचा -Rahul Gandhi on BJP and RSS: भाजपमध्ये 'ती' हिंमत नाही, ते फक्त बोलतात, हिंदुस्तान आमच्यासोबत- राहुल गांधी)
#WATCH | Shiv Sena (UBT) MLC Aamshya Padavi joins Shiv Sena in the presence of Maharashtra CM Eknath Shinde. pic.twitter.com/pWfn9JwPng
— ANI (@ANI) March 17, 2024
विधानसभा निवडणुकीत दोनवेळा पराभव -
आमश्या पाडवी यांनी 2014 आणि 2019 मध्ये अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे के.सी. पडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. परंतु, दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी यांना 80,777 मते मिळाली होती.