Pratap Sarnaik and Enforcement Directorate: ईडी कार्यालयात आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक यांची चौकशी

सरनाईक पिता-पूत्र आणि यौगेश चंदेला यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आज होणाऱ्या चौकशीचे ऑडिओ-व्हिडिओ चित्रिकरण व्हावे, चौकशी सुरु असताना वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि ईडिने त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करु नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
Pratap Sarnaik and Enforcement Directorate: ईडी कार्यालयात आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक यांची चौकशी
Pratap Sarnaik, Vihang Sarnaik | (Photo Credit: Instagram)

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक (Purvesh Sarnaik) यांची आज (गुरुवार, 10 डिसेंबर) अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी सरनाईक ठाणे येथून निघाल्याचे वृत्त आहे. 175 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात ही चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना नुकताच दिलासा दिला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच सरनाईक हे ईडी कार्यालयात हजेरी लावत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण टॉप्स सिक्योरिटी कंपनी संबंधित आहे. या कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी होत आहे.  (हेही वाचा, Pratap Sarnaik Protection From Arrest:अटक टळली, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा)

सरनाईक पिता-पूत्र आणि यौगेश चंदेला यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आज होणाऱ्या चौकशीचे ऑडिओ-व्हिडिओ चित्रिकरण व्हावे, चौकशी सुरु असताना वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि ईडिने त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करु नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना सरनाईक कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारे कठोर कारवाई करु नये असे निर्देश ईडीला दिले आहेत.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात सहकुटुंब जाऊन नुकतेच दर्शन घेतले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलाताना देशावरील कृषी काद्याचे आणि सरनाईक कुटुंबीयांवरील इडीचे इडापीडा टळो असे गाऱ्हाणे आपण श्री सिद्धीविनायक चरणी घातल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या रुपात सरनाईक यांना आज बाप्पाच पावला अशी चर्चा सुरु झाली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change