तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले- नितेश राणे
Nitesh Rane and Eknath Shinde (Photo Credits: PTI/Twitter)

महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाने (Taukte Cyclone) धुमाकूळ घातल्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कोकणदौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या एक तासाच्या दौ-यावर विरोधकांनी खरपूस टिका केला. दरम्यान "तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. उद्धव ठाकरे हे कोकणात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, कपड्याची इस्त्रीही मोडून न देता ते मुंबईत परतले. याउलट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोकणवासियांना मदत तरी पाठवली" अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले.

"एकनाथ शिंदेंचे मी आभार मानतो. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे," हा माझा मैत्रीपूर्ण सल्ला असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.हेदेखील वाचा- उद्धव ठाकरे खरंच BEST CM; कोकण दौऱ्यावरुन MNS चा उपहासात्मक टोला

दरम्यान उद्धव ठाकरे केवळ चिवला बीचवर जाऊन माघारी फिरले. चिवला बीचवर ते राणे साहेबांचं घर पाहायला आले होते का? कदाचित त्यांचं आमच्यावरील प्रेम आजही कमी झालेलं नाही. कारण याठिकाणी ते खूप दिवस राहिले आहेत, आमच्याबरोबर जेवले आहेत. त्यामुळे त्यांना बघायचे असेल की, राणेंच्या घराला तर काही नुकसान झाले नाही ना, असा टोला नितेश यांनी लगावला.

मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत ज्या भागात सर्वात जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे मुळात याला दौरा म्हणू शकता का ? देवेंद्रजी कोकणात फिरता हेत, मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तर द्यावी लागतील म्हणून उद्धव ठाकरेंनी हा दौरा केला का, असा सवालही नितेश यांनी उपस्थित केला.