Shivsena (Photo Credits: PTI)

बिग बाझारमध्ये (Big Bazaar) पाकिस्तान बनावटीच्या वस्तूंची विक्री तात्काळ बंद करावी या मागणीसाठी वसईमध्ये (Vasai)  आज शिवसैनिकांनी आंदोलन केले. मुंबईसह महराष्ट्रामध्ये कुठेच पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची विक्री होऊ नये म्हणून शिवसेना आक्रमक झाली आहे. 'say-no-to-Pakistani-goods'भूमिकेत असलेल्या शिवसैनिकांनी इतर दुकानदारांनाही हा इशारा दिला आहे.

वसईच्या बिग बाझार मॉलमध्ये (Big Bazaar)  काही पाकिस्तानी बनावटीचे मसाले विक्रीस ठेवले होते असा शिवसैनिकांचा दावा आहे. काही शिवसैनिक बिग बाझारच्या ऑफिसमध्ये घुसले. संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी लेखी स्वरूपात पत्रक देऊन पाकिस्तानी बनवटीच्या वस्तू हटवण्यासाठी सांगितले आहे.

शिवसेनेने केवळ बिग बाझारलाच नव्हे तर मुंबई सह महाराष्ट्रातील इतर दुकानामध्येही दुकानातील सारी पाकिस्तान बनावटीच्या वस्तूंची 'साफसफाई' करण्याचा इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध पाहता सांस्कृतिक किंवा खेळ क्षेत्रामध्ये त्यांच्यासोबत भारताने कोणतेच संबंध ठेवण्यास शिवसेनेचा कडाडून विरोध आहे.

भारतीय जवानाची जम्मू काश्मिरमध्ये इंटरनॅशनल बॉर्डरवर रामगड सेक्टरवर हत्या झाल्यानंतर शिवसैनिकांनी 19 सप्टेंबर दिवशी आंदोलन केले होत. पाकिस्तानी खेळाडूंना भारतामध्ये खेळणं रोखण्यापासून अगदी महाराष्ट्रात अतिफ असलमचे शोज रोखण्यापासून ते अगदी बिग बॉसमध्ये पाकिस्तानी सेलिब्रेटींचा प्रवेश रोखण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली होती.