Shiv Jayanti Tithi 2020: मुंबई विमानतळावर रंगणार शिवजयंतीचा सोहळा; सीएम उद्धव ठाकरे करणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
The Mumbai International Airport | (Photo Credits: PTI)

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती (Chatrapati Shivaji Maharaj Jayanti) साजरी करण्यात येत आहे. फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 या दिवशी शिवाजी महाराज यांचा जन्म झाल्याचे दाखले उपलब्ध आहेत. त्यानुसार दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. आज तिथीनुसार ही जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) मोठा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. यावेळी मुंबई विमानतळ टी 2 टर्मिनल समोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आज सकाळी 9.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल.

आज तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्शनी भागात पुर्नस्थापन करण्यात येत आहे. पुतळ्याच्या बाजूला शिवनेरीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. आज हा संपूर्ण परिसरच शिवमय झाला आहे. शिवसेना आणि भारतीय कामगार संघटनेच्या वतीने हा शिव जयंतीचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होईल, त्यानंतर मुख्यमंत्री जमलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. (हेही वाचा: तिथीनुसार शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images शेअर करुन साजरा करा यंदाचा शिवजन्मोत्सव)

या कार्यक्रमासाठी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन आणि संसदिय कामकाज मंत्री अँड.अनिल परब सोबत शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, 1999 साली माजी पतंप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पुतळ्याचे भूमिपूजन केले होते. मात्र पुढे 1012 साली विमानतळाच्या कामकाजामुळे हा पुतळा सहार गावा जवळील वेअर हाऊस येथे हलवण्यात आला. 6 2020 मार्च रोजी पुन्हा हा पुतळा विमानतळावर बसवण्यात आला, ज्याचे आज अनावरण होत आहे.