राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी सांगितले की गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल (Gujarat Election Results) अपेक्षेप्रमाणे आले आहेत. मतमोजणीत भारतीय जनता पक्ष (BJP) 182 पैकी 93 जागा जिंकून 64 जागांवर आघाडी घेत ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. राष्ट्रवादीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना पवार म्हणाले, गुजरातच्या निवडणुका अपेक्षेप्रमाणे आल्या, कारण सत्तेची संपूर्ण यंत्रणा विशिष्ट राज्यासाठी लावली गेली. तेथे प्रकल्प पाठवले गेले.
ते म्हणाले, गुजरात निवडणुकीचे निकाल देशाचा मूड सांगत नाहीत. दिल्ली आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे, जिथे भाजपचा पराभव झाला. एकीकडे भाजप गुजरातमध्ये दणदणीत विजयाकडे वाटचाल करत असताना, काँग्रेस पक्ष हिमाचलमध्ये पुन्हा सत्तेत येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ताज्या ट्रेंडनुसार, काँग्रेसने विधानसभेच्या एकूण 68 पैकी 29 जागा जिंकल्या आहेत. तर 10 जागांवर आघाडीवर आहे. हेही वाचा BMC Election 2023: गुजरातच्या यशामुळे मुंबई भाजपच्या आशा पल्लवीत! पण, उद्धव ठाकरे यांचे आव्हान पेलणार का?
दुसरीकडे भाजपने आतापर्यंत 16 जागा जिंकल्या असून 10 जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत होत आहे. सध्या तरी राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार हे सांगणे कठीण आहे. दुसरीकडे काल झालेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने 15 वर्षांपासून महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला.