Ramdas Athawale on Sharad Pawar: 'शरद पवार धर्मनिरपेक्ष'; रामदास आठवले यांची राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
Ramdas Athawale on Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Ramdas Athawale on Sharad Pawar: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना 'शरद पवार हे जातीयवादी नव्हे तर धर्मनिरपेक्ष आहेत' असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आता रामदास आठवले यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते याबाबत उत्सुकता आहे.

राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप लावला. त्यामुळे चर्चा होणे स्वाभाविक होते. दरम्यान, रामदास आठवडे यांनी मात्र शरद पवार यांची पाठराखण केली आहे. शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत. त्यांनी जातीयवादाचे राजकारण कधीही केले नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sujat Ambedkar on Raj Thackeray: सुजात आंबेडकर यांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान, 'दंगल पेटवायची असल्यास प्रथम स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवा')

औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे संपूर्ण श्रेय हे शरद पवार यांनाच जाते असेही आठवले यांनी म्हटले आहे. पुलोदचे सरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार यांनी औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव एकमताने मंजूर केला. त्यानंतर राज्यभरात एकच दंगल उसळली. त्यामुळे नामांतर लांबणीवर पडले तरीही मधल्या काळात शरद पवार यांनी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले. एकमेकांच्या विरोधात असलेल्या समजामध्ये मतैक्य घडवूण आणण्याचे कामही पवार यांनी केल्याचे आठवले यांनी सांगितले.