राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आपला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात, जर त्यांनी कोणाला शब्द दिला तर मग ते कोणत्याही परिस्थितीत पाळतातच. यावेळी देखील सोलापूरात (Solapur) एका लग्नाला भरपावसात शरद पवारांनी एका लग्नाला हजेरी लावली आहे. शरद पवारांनी सोलापुरातील आपल्या सहकाऱ्याच्या दिलेला शब्द पाळला आणि त्याच्या भर पावसात त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहिले. यापुर्वी देखील साताऱ्यात भरपावसातली शरद पवार यांची सभा गाजली होती. यावेळी देखील भर पावसात शरद पवारांनी लग्नाला हजेरी लावल्याने त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा केली जात आहे.
सोलापुरात भर पावसात शरद पवार पुन्हा भिजले, पावसात लग्न सोहळ्याला उपस्थिती
शरद पवार पावसात भिजले म्हणजे सरकार बदलतात अशी चर्चा लग्न समारंभात सुरू झाली.#SharadPawar #NCP #AjitPawar pic.twitter.com/Ftt5NsteUS
— Ajay (@AjayDhanje) May 7, 2023
सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाला. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र भर पावसात शरद पवार यांचे आगमन झाले. यावेळी नव वरवधूला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार स्वतः गाडीतून उतरून खाली आले आणि दोघांना शुभेच्छा दिल्या. खरं तर रविवारी सकाळपासून शरद पवार हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते.