महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची धामधूम आता सुरू झाली आहे. प्रचार आणि राजकीय आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अशात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून भाजपाच्या नेत्या शायना एन सी (Shaina NC) यांना तिकीट जाहीर केल्यानंतर उबाठा च्या अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याकडून शायना यांचा उल्लेख करताना वादग्रस्त टीप्पणी झाली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी 'आमच्याकडे निवडणूकीत इम्पोर्टड माल चालत नाही' असा उल्लेख केला. शायना यांनी त्यांचा उल्लेख 'माल' म्हणून केल्याने आक्षेप नोंदवला आहे.
शायना एनसी भडकल्या
#WATCH | Mumbai: On Shiv Sena (UBT) leader Arvind Sawant's 'imported maal' remark, Shiv Sena leader Shaina NC says, "On one side there is Eknath Shinde's Ladki Behan Yojana, on the other side there is Prime Minister's Ujjwala, Mudra Banking, Housing Scheme, where women are… https://t.co/ASksHmuLak pic.twitter.com/uWirkS7SST
— ANI (@ANI) November 1, 2024
शायना एन सी यांनी अरविंद सावंत यांना सुनावले आहे. अरविंद सावंत यांनी केलेल्या टीपण्णी मध्ये महिल्यांचे 'objectification' चूकीचे असल्याचं म्हटलं आहे. ही प्रतिक्रिया त्यांच्या मानसिकतेमधून आली आहे. कारण त्यांच्या बाजूला उभे असलेले मविआ चे उमेदवार, अमीन पटेल देखील हसत होते. आता निवडणूक निकालात ते बेहाल होतील. असे शायना म्हणाल्या आहे. यासोबतच त्यांनी आता संबंधित प्रकरणी नागपाडा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.
शायना एनसी यांना शिवसेनेने महायुतीच्या उमेदवार म्हणून मुंबादेवी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या समोर मविआ कडून कॉंग्रेसच्या अमीन पटेल यांना उमेदवारी दिली आहे.