Shabana Azmi: शबाना आजमी यांच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणाचा 26 IITians द्वारा तपास
Shabana Azmi | (File Photo)

अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी मागवलेल्या ऑनलाईन मद्य ऑर्डरमध्ये त्यांना गंडा खालणाऱ्या संशयीतांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती सायबर पोलिसांनी (Cyber Police) दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत 24 संशयीतांची ओळख पटली आहे. त्यात काही आयटीयन्सचाही समावेशअसल्याची माहिती पुढे येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ऑनलाईन फ्रॉडसंदर्भात अनेक तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली त्यानंतर हे यश आल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट पोलिसांना सायबर (Maharashtra Cyber Police) गुन्ह्यांची उकल करण्यात वेग यावा यासाठी 26 आयटी तज्ज्ञांची सायबर क्राईम विभागात नोंद करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार 2017 ते 31 मे 2021 या काळात एटक्या मुंबई शहरात आतापर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तब्बल 8,284 तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. त्यातील 945 तक्रीरी निवारणात पोलिसांना यश आले आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले सायबर स्पेशालीस्ट सायबर तक्रारी निवारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावतील. जेणेकरुन गुन्ह्यांचा तपास लवकर लागून गुंता सुटण्यास मदत होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

राज्य सायबर सेल अधिकाऱ्याच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नव्याने नियुक्त करण्यात आलेले सायबर अधिकारी सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण करतील. तसेच, सरकारी सायबर ऑडीटही करतील. या सायबरतज्ज्ञांना गुगल सायबरसुरक्षेचा प्रदीर्घ अनुभव आहे. खास करुन हॅकर्सच्या बाबतीत. सायबर तज्ज्ञांचे पथक हे वीज आणि रेल्वे सायबर दहशतवादापासून बचाव करण्यासाठी अधिक सविधा निर्मिती करेन.

शबाना आजमी यांनी 24 जून रोजी ऑनलाई पद्धतीने मद्य मागवले होते. त्यानंतर काहींनी ती ऑर्डर स्वीकारली अॅडव्हान्समध्ये पैसेही घेतले. परंतू, त्यांना मद्याची ऑर्डर मात्र पोहोच केली नाही. त्यामुंळे संतापलेल्या शबाना आजमी यांनी ट्विटरद्वारे सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच, आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे म्हटले होते. शबाना आजमी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मी ऑनलाईन मद्य ऑर्डर केल्यांतर आगावू पैसेही संबंधित अकाऊंटवर भरले होते. आगावू पैसे घेऊनही ऑर्डर न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे आजमी यांनी म्हटले होते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील एका जोडप्यासोबतही असाच प्रकार घडला होता. या जोडप्यानेही ऑनलाईन मद्य ऑर्डर केली होती. मात्र, सायबर गुन्हेगारांनी या जोडप्याचीही फसवणूक करत तब्ल 68,000 रुपयांना चुना लावला.

विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी म्हटले आहे की, सल्लागार म्हणून सायबर तज्ञांची नेमणूक करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व सायबर गुन्हेगारी रोखण्यात आणि त्यांची ओळख पटविण्यात त्यांची सक्रिय भूमिका असेल. या सल्लागारांनी त्यांनी एका आठवड्यापासून काम सुरू केले आहे. त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण झाली होती. ते आता राष्ट्रीय सायबर क्राइम रजिस्ट्रीच्या डेटाबेसमधून स्कॅन करतील, जेथे लोक तक्रारी सबमिट करतात.