सेक्स क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणांकडून उकळले 50 हजार; तरूणीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो)

सेक्स क्लीप (Sex Clip) व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणांकडून 50 हजार रुपये उकळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची सेक्स क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत 6 जणांच्या टोळीने तरुणाकडे 5 लाख रूपयांची खंडणी मागितली. त्यापैकी तरूणाकडून 50 हजार उकळण्यात आले होते. दरम्यान, तरूणाने स्थानिक पोलिसात धाव घेतली सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर 6 जणांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्ह्या नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी तरूण हा 29 वर्षाचा असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात राहणारा आहे. फिर्यादी तरुणाची गेल्या काही महिन्यांपूर्वी एका मुलीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. यातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. 24 जानेवारी रोजी दोघे खंडेश्वरी मंदिर परिसरातील एका खोलीत गेले. त्यावेळी दोघांचा खासगी क्षणांचा व्हिडिओ तरुणीच्या साथीदारांनी तयार केले. एवढेच नव्हेतर 5 लाख रुपये न दिल्यास हा व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी आरोपींकडून तरूणाला देण्यात आली होती. तरुणाने घाबरून 50 हजार रुपये तात्काळ दिले. मात्र, या टोळीकडून 5 लाख रुपये दे अन्यखा क्लिप व्हायरल करु, अशी धमकी मिळाल्याने तरूणाने बीड पोलीस ठाणे गाठले. हे देखील वाचा- धक्कादायक! 'डॉक्टर डेथ' सातारा पोलिसांच्या ताब्यात; 22 महिलांच्या खुनाचा आरोप, 6 सिद्ध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विरोधात अगोदरपासून कट रचल्याचे समजते आहे. आरोपींपैकी काहीजणांना फिर्यादी ओळखत असल्याचेही पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. तसेच या टोळीने आधाही कोणाची फसवणूक केली आहे का? यांचाही पोलीस शोध घेत आहेत.