Anil Diggikar (PC - X/@Deepakthakur_1)

New GM Of BEST: वरिष्ठ आयएएस अधिकारी अनिल डिग्गीकर (IAS officer Anil Diggikar) यांनी मुंबईतील बेस्टचे महाव्यवस्थापक (GM Of BEST) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी यापूर्वी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय डिग्गीकर यांनी जेएनपीटीचे अध्यक्षपदही भूषवले होते.

डिग्गीकर यांनी रत्नागिरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध सरकारी विभागांमध्ये अनेक प्रमुख कार्यकारी भूमिका पार पाडल्या आहेत. (हेही वाचा -BEST कडून कुर्ला पश्चिम ते वांद्रे पूर्व स्टेशन मार्गावर एसी डबल डेकर बस सुरू)

दरम्यान, प्रमुख नियुक्त्यांपैकी, डिग्गीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पुण्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे (महाऊर्जा) महासंचालक आणि बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. (वाचा - Public Transpor on Atal Setu: उद्यापासून मुंबईच्या अटल सेतूवर बेस्ट बस क्रमांक एस-145 सुरु; जाणून घ्या मार्ग, वेळा आणि दर)

तथापी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर अनिल डिग्गीकर ताफ्यासाठी बसेसची खरेदी जलद करण्याची शक्यता आहे. सध्या बेस्टला तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते.