मुंबई शहरामध्ये वाढता कोरोना व्हायरसचा धोका पाहता आता आरोग्य विभागाने मुंबई शहरात रिक्त पदांवर भरती सुरू केली आहे. दरम्यान सध्या मुंबई महानगर पालिकेने 144 जागांवर वॉर्ड बॉयसाठी भरती जाहीर केली आहे. साठी इच्छुक उमेदवारांना 17 एप्रिलपर्यंत आवेदन ऑनलाईन माध्यमातून सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोव्हिड 19 ची बाधा झालेल्या रूग्नांची सेवा तसेच यासंदर्भातील इतर कामकाज करण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अख्यारिखालील विशेष रूग्णालयांमध्ये या वॉर्डबॉयची नियुक्ती केली जाणार आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात कोण बनू शकतं 'कोविड योद्धा'? कसा कराल संपर्क, काय आहेत अटी?
दरम्यान इच्छुक उमेदवारांना मुंबई महापालिकेच्या portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर देण्यात आलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे. सर्व नियम आणि अटी वाचल्यानंतर तो अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF Format मध्ये अर्जासह mcgm.wardboy@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायच्या आहेत. दरम्यान ऑफलाईन माध्यमातून अर्ज दाखल करायचा असल्यास तो महापालिकेच्या मुख्यालयातील गेट नंबर 7 वर ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. दरम्यान यासाठी 17 एप्रिल 2020पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
पात्रता निकष व पगार
इच्छुक उमेदवार किमान 10 वी पास असावा.
खुल्या वर्गातील उमेदवाराचं वय18-38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवाराचं वय 18-43 वर्ष असावं.
पुरूष उमेदवाराचं वजन किमान 50 किलो आणि उंची 157 सेमी असावी तर स्त्री उमेदवाराचं वजन किमान 45 किलो आणि उंची 150 सेमी असावी.
वेतन श्रेणी ही लेव्हल एन असून 18-56,900 रूपये आणि भत्ता असा असेल.
दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना निवडीच्या दिवसापासुन 3 दिवसांत रूजू होणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कोणताही अनुभव असलेल्या, शिक्षण घेतलेले असलेल्या व्यक्तींना कोव्हिड योद्धा होण्याचं आवाहन करत त्यांना वॉर व्हर्सेस व्हायरसच्या या युद्धामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.